वहागाव वार्ताहर
खोडशी तालुका कराड येथे वन खात्याने दोन दिवस तळ ठोकून सर्पमित्र व ग्रामस्थांच्या मदतीने मगर आपल्या जाळ्यात घेतली. तब्बल 96 तासाचे टिंग ऑपरेशन यशस्वी झाल्याने वन अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.
कृष्णा नदी मधून ओढ्या मार्गे मगर कृष्णा डेरी चौकात रस्त्यावर दिसली होती. यामुळे खोडशी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सोमवारी दिवस रात्र मगर पकडण्याचे काम वन खात्याकडून शर्तीच्या प्रयत्नातून सुरू होते मात्र दोनदा दिसूनही मगरीने चकवा दिला होता. मंगळवारी पुन्हा वन खात्याच्या टीमने, सर्पमित्र व खोडशी ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरा नऊ ते दहा फूट लांबीची मगर आपल्या जाळ्यात जेरबंद केली.
यावेळी वन अधिकारी पी.डी. नवले, वनपाल वराडे सागर कुंभार, वनरक्षक अरविंद जाधव, वाहन चालक योगेश बडेकर, वनमजूर शंभूराज माने, यांनी सर्पमित्र व ग्रामस्थांना घेऊन शर्तीचे प्रयत्न केले. वनखात्याने पकडलेली मगर बघण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी ग्रामस्थांनी मगर पकडल्याची बघून सुटकेचा श्वास सोडला.
दरम्यान, गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते गेली दोन दिवस ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे वन खात्यासमोर मगर पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. अखेर वन खात्याने आपले मिशन फत्ते करून दाखवले.









