सेन्सेक्स 57 अंकांनी प्रभावीत : जागतिक संमिश्र वातावरणाचा नकारात्मक परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अखेरच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्ये जागतिक बाजारातील संमिश्र वातावरणामुळे शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार घसरले. दरम्यान आरबीआयने सलग 11 व्यांदा रेपो दर 6.5 टक्केवर स्थिर ठेवल्याने बाजार घसरले. तत्पूर्वी, बाजार सलग पाच व्यापार सत्रांमध्ये उच्च पातळीवर बंद झाला होता. एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिसचे शेअर्स तेजीत होते मात्र तेही घसरणीसह बंद झाले.
बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स दिवसअखेर 56.74 अंकांनी किंवा 0.07 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 81,709.12 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील 30.60 अंकांच्या किंवा 0.12 टक्क्यांच्या किंचित घसरणीसह 24,677.80 वर बंद झाला.
सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी अदानी पोर्ट्स (अदानी पोर्ट्स) च्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. याशिवाय एशियन पेंट्स, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, कोटक बँक, स्टेट बँक यांचे समभाग घसरत आहेत.
दुसरीकडे, टाटा मोटर्सचे समभाग 3 टक्केपेक्षा जास्त वाढले. तसेच अॅक्सिस बँक, मारुती सुझुकी, आयटीसी, टाटा स्टील, एल अँड टी, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील, नेस्ले इंडिया या कंपन्यांचे समभागही वधारलेले दिसले.
बाजारातील घसरणीचे कारण
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तरलता स्थिती सुलभ करण्यासाठी बँकांचे रोख राखीव प्रमाण (सीआरआर) 4.5 टक्क्यांवरून 4 टक्के पर्यंत कमी केले आहे. त्यामुळे बँकांच्या शेअर्समध्ये घट झाली आहे.
2.याशिवाय, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस समभागांमध्ये घसरण, ज्यांचे निर्देशांकात मोठे वजन आहे, यांनी बाजार खाली खेचला.
- एकूणच बाजारने संमिश्र कामगिरी केली. बाजाराची सावध पण लवचिक आणि मजबूत भूमिका यातून दिसते. त्याच वेळी, विविध क्षेत्रे आणि निवडक समभागांमध्ये झालेल्या विक्रीचा बाजारातील भावावर परिणाम झाला आहे.









