सेन्सेक्स 351 तर निफ्टी 97 अंकांनी वधारत बंद
मुंबई :
चालू आठवड्यातील बुधवारच्या सत्रात भारतीय भांडवली बाजारातील मागील तीन सत्रातील सलगच्या घसरणीला पूर्णविराम मिळाला आहे. यामध्ये सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत होत बंद झाले आहेत. यामध्ये दिग्गज कंपन्यांमध्ये व्होडाफोनआयडियाचे समभाग हे जवळपास 15 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बुधवारी बीएसई सेन्सेक्समधील 30 समभागांच्या आधारे दिवसअखेर सेन्सेक्स 351.49 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.53 टक्क्यांसोबत 66,707.20 वर बंद झाले आहेत. यासोबतच दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 97.70 अंकांसोबत वधारत 0.5 टक्क्यांसह निर्देशांक 19,778.30 वर बंद झाला आहे.
दिवसभरातील उलाढालीमध्ये दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाचे समभाग हे सर्वाधिक 15 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहे. याचदरम्यान निफ्टीमधील लार्सन अॅण्ड टुब्रोचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 3.56 टक्क्यांनी वधारुन बंद झाले.
..या क्षेत्रांची झाली मदत
भारतीय शेअर बाजारात कॅपिटल गुड्स , एफएमसीजी आणि रियल इस्टेट क्षेत्रांचा निर्देशांक हा प्रत्येकी 1 टक्क्यांनी तेजीत राहिला आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप यांचे निर्देशांक हे वधारले आहेत. बीएसई सेन्सेक्समध्ये लार्सन अॅण्ड टुब्रोचे समभाग हे सर्वाधिक 3.30 टक्क्यांनी वधारुन बंद झाला आहे. यासोबतच आयटीसीचे समभाग 2.11 टक्के, सनफार्मा 1.70, रिलायन्स इंडस्ट्रीज 1.65, कोटक महिंद्रा बँक 1.12, अॅक्सिस बँकचे समभाग हे 1.10 व इन्फोसिसचे समभाग हे 1.07 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील बजाज फायनान्स 2.29 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहे. यासह बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टेक महिंद्रा, एशियन पेन्ट्स. टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक आणि आयटीसीचे समभाग घसरणीसह बंद झाले आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी प्रभावीत होत 80 च्या पातळीवर बंद झाला आहे.









