निफ्टी मात्र तेजीसोबत बंद : पाच सत्रातील कामगिरीला ब्रेक
मुंबई :
देशातील भारतीय भांडवली बाजारात बुधवारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये घसरणीचा कल राहिला होता. यामध्ये मागील पाच सत्रांच्या तेजीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स 33.01 टक्क्यांनी घसरला आहे. याच्या दुसऱ्या बाजूला निफ्टी मात्र तेजीसोबत बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 33.01 टक्क्यांनी प्रभावीत होत निर्देशांक 65,446.04वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 9.50 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 19,398.50 वर बंद झाला आहे. बुधवारच्या सत्रात बीएचइएलचे समभाग सात टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच सुझलॉन एनर्जीचे समभाग 4 टक्क्यांनी घसरले आहेत.
या समभागांची घसरण
बीएसई सेन्सेक्समध्ये एचडीएफसी बँकेचा समभाग 3.20 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच एचडीएफसीचे समभाग 2.93 टक्क्यांनी, बजाज फिनसर्व्ह 0.80 टक्क्यांनी व विप्रोचे समभाग 0.57 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. टाटा मोर्ट्स, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, बजाज फायनान्स आणि अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग प्रभावीत राहिले.
दुसऱ्या बाजूला मारुतीचे समभाग 3.61 टक्क्यांनी सर्वाधिक तेजीत राहिले आहेत. यामध्ये इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रिड कॉर्प, नेस्ले इंडिया, टायटन, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एशियन पेन्ट्स, एचसीएल टेक, लार्सन अॅण्ड टुब्रो, टाटा स्टील, टीसीएस, स्टेट बँक आणि कोटक महिंद्राचे समभाग हे वधारुन बंद झाले.
या क्षेत्रांची स्थिती
प्रमुख क्षेत्रांची कामगिरी पाहिल्यास यामध्ये वाहन, एफएमसीजी, पीएसयू बँक आणि ऑईल अॅण्ड गॅस यांचे समभाग प्रत्येकी एक टक्क्यांनी वधारले आहेत. तसेच बँकिंग क्षेत्रात विक्री झाल्याचे दिसून आले. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप यांचे निर्देशांक 0.7 ते 0.7 टक्क्यांनी तेजीत राहिले होते. डॉलरच्या तुलनेत रुपया 20 पैशांनी घसरत 82.22 वर बंद झाला.









