बहुप्रतिक्षित बेळगाव खानापूर रोड, बसवेश्वर सर्कल, गोवावेस पर्यंतच्या दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे प्रलंबित विकास काम अखेर नुकतेच सुरू झाले आहे. त्यामुळे टिळकवाडी येथील शुक्रवार पेठ, आणि आरपीडी क्रॉस पासून रस्त्याची एक बाजू बंद करण्यात आली आहे . दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढली असून , मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

यामुळे वाहन चालकांना खानापूर रोडवर येण्यासाठी पर्यायी मर्गाने वळसा घालून यावे लागत आहे. गणेशोत्सव पुढच्यात महिन्यात येत असल्याने तत्पूर्वी येथील रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.









