नवीन इमारत बांधकामाच्या सुऊवातीकडे अनेकांचे लक्ष : जुन्या आठवणी स्वप्नांतून साकारणार
बेळगाव : 50 वर्षांपूर्वीची आरटीओ इमारत आता भुईसपाट झाली आहे. त्या ठिकाणी केवळ जुन्या इमारतीचे अवशेष उरले असून तेही हटविण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान सर्व जुन्या आठवणी आता नव्या इमारतीच्या स्वप्नांतून साकाराव्या लागणार यात शंका नाही. सध्या संपूर्ण कार्यालय पाडण्यात आले असून नूतन इमारतीचे बांधकाम कधी सुरू होणार याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. बेळगाव आरटीओ कार्यालयाची नूतन इमारत बांधण्याच्या कामाला गती मिळाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हीं इमारत बांधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे जुन्या आरटीओ कार्यालयावर सोमवारी जेसीबी फिरविण्यात आला आहे. सध्या सपाटीकरण करण्याचे काम करण्यात येत आहेत. तब्बल 50 वर्षांपूर्वींपासून आपले अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या आरटीओ इमारत पाडण्यास सुरूवात झाली आणि इमरात पाडवून तेथील साहित्यही हलविण्यात आले आहे. कोल्हापूर सर्कल येथे आरटीओची जुनी इमारत आहे. त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव केएसआरटीसीकडे पाठविण्यात आला होता. ही प्रक्रिया मागील चार वर्षांपासून सुरू होती. अखेर त्याला मंजुरी मिळाली असून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तेथील सर्व कामकाज आता बीएसएनएल कार्यालयात हलविण्यात आले आहे. संपूर्ण इमरात पाडविण्यात आली आहे. आता नवीन इमारतीच्या बांधकामाला कधी सुरूवात होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.









