सातारा :
घरात न सांगता ती निघून गेली. लक्षात आल्यावर सर्वांनी शोधाशोध सुरू केली. ती अल्पवयीन असल्याने प्रत्येकजण काळजीत होता. प्रत्येक संशयाच्या जागेत शोधाशोथ करत असताना कोणताच धागा दोरा सापडत नसल्याने पोलिसांसह कुंटुंबाची चिंता वाढली होती. तिच्या मैत्रिणीच्या वडिलांना कोणीतरी माही घरातून न सांगता निघून गेली. अद्याप तिचा थांगपत्ता लागला नसल्याचे सांगितले. हे ऐकून मैत्रिणीचे वडील माहीला घेऊन थेट तिच्या घरी पोहोचले. सायंकाळी ५ वाजता गेलेली माही सकाळी घरी पोहोचताच कुंटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला.
एमआयडीसी येथे राहत असलेली माही सुमन चिंरेंद्र नमसुदरू (वय ९) ही शनिवारी ५ वाजण्याच्या सुमारास जवळच्या परिसरात राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी गेली. ही बाब आई वडिलांना माहिती नव्हती. रात्र झाली तरी माही घरी न आल्याने तिल्या जाईने माहीने वडील धिरेंद्र यांना माही घरी न आल्याचे सांगितले. दोघांनी सर्वत्र शोष घेराला परंतु माही कुठेय दिसेनाशी झाली. तासभर शोधूनही माही सापडत नसल्याने दोघांनी थेट सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना भेटून मुलगी बेपता झाल्याचे सांगितले. या घटनेची पोलीस निरीक्षक मस्केनी तात्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल केला नंतर गोडोली जाऊन माही राहत असलेल्या परिसरात शोष कार्य सुरू केले. रात्रीचे १२ वाजले तरी माहीचा काहीच पत्ता लागत नसल्याचे आई वडिलांने व पोलिसांचे टेंशन वाढले. पोलीस निरीक्षक मस्के यांनी पोलीस ठाण्याचे ५ अधिकारी, ६० ते ७० अंमलदार यांना शोध कार्यासाठी बोलवून घेतले. परिसरातील १५ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एमआयडीसी परिसरातील निर्जन ठिकाणे, बसस्टेशन, रेल्वेस्टेशन झाडी, झुडपे, आजूबाजूचे शेती, विहीरी असे करत संपूर्ण परिसर पिंजून काढला तरीही माही सापडत नव्हती. ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली. माही सापडत नसल्याने आईने हंबरडा फोडला. अनेकांना अश्नु जनावर झाले. श्वान पथक, ड्रोन में मेऱ्यातून शोधकार्य सुरू झाले पहाटेचे पाच वाजले तरीष्ठी कोणतेव धागेदोरे सापडत नसल्याने चिंता आणखी वाढली होती. याबाचत पोलिसांनी सोशल मीडियावर मुलगी हरवल्याभी पोस्ट शेअर केली.
- माही मैत्रिणीच्या घरी असल्याची झाली माहिती
या शोष मोहिमेदरम्यान, माही एका चाळीमध्ये खेळताना दिसून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ तिथे जावून पाहणी केली. तेव्हा माही तिच्या शाळेतील मैत्रिणीच्या घरी होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेत कुंटुंबियांना दिली. तिला पाहून आई वडिलांना आनंदअश्रू अनावर झाले. मैत्रिण श्रावणी चव्हाण हिचे वडील लक्ष्मण चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता माहीने घरी खेळायला व रहायला आल्याने सांगितले. यावर त्यांनी विश्वास ठेवला.
- मस्के साहेबांवर कौतुकाचा वर्षाव
शनिवारी रात्री माली बेपत्ता झाल्याचे कळताच पोलीस निरीक्षक मस्के यांनी गुन्हा दाखल करून तात्काळ शोधकार्य सुरू केले. अल्पवयीन मुलगी जसल्याने पोलिसांनी चिंता आणखी वाढली. जोपर्यंत तिचा शोध लागत नाही. तोपर्यंत कुणीही थांबायचे नाही अशा सूचना देत स्वतःही पोलीस निरीक्षक मस्केनी रात्र जागून काढली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आणि माही सकाळी सुखरूप स्वतःच्या घरी पोहोचली. या घटेनबाबत पोलिसांनी दाखवलेल्या तत्पर्तेमुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक झाले पोलीस निरीक्षक मस्के यांचे सर्व गोडोलीवासियांनी आभार मानले.








