उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण
कर्मचाऱ्यांचा जल्लोष, महापालिका चौकात आनंदोत्सव
कोल्हापूर
महापालिकेतील 507 रोजंदारी कर्मचारी 25 वर्षापासून कायम होण्याच्या प्रतिक्षेत होते. या पैकी 490 रोजंदारी कर्मचाऱ्यांना शनिवारी कायम ऑर्डर देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात प्रतिकात्मक स्वरुपात 5 कर्मचाऱ्यांना ऑर्डर देण्यात आल्या. यानंतर सायंकाळी महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात कर्मचारी संघाचे संजय भोसले यांच्या हस्ते उर्वरीत कर्मचाऱ्यांना ऑर्डर देण्यात आल्या.
शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये 5 कर्मचाऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्तीपत्र देण्यात आली. यानंतर सायंकाळी विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये उर्वरीत सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
490 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र
महापालिकेमध्ये 507 रोजंदारी कर्मचारी 30 वर्षाहून अधिक काळ कार्यरत होते. यापैकी 490 कर्मचाऱ्यांना शनिवारी नियुक्तीपत्र देण्यात आले. 507 कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव महापालिकेकडून पाठविण्यात आला होता, यापैकी 498 कर्मचारी पत्र ठरले होते. 8 कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी मयत तर काही कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा ओलांडली होती.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा शब्द दसरा चौक येथील सभेत दिला होता. हा शब्द पुर्ण झाला. याचा आनंद होत आहे. वारंवार केलेल्या पाठपुराव्यास यश आले. तसेच कायम झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनपुर्वक अभिनंदन केले.
आमदार राजेश क्षीरसागर
गेल्या 25 वर्षापासूनच्या कर्मचारी संघाच्या लढ्याला यश आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार राजेश क्षीरसागर यांचे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो. तसेच महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी व इतर कर्मचाऱ्यांनीही यामध्ये वेळोवेळी मदत केली.
कर्मचारी महासंघाचे संजय भोसले








