मोरजी /प्रतिनिधी
मरडीवाडा मोरजी येथील मुख्य स्त्यावरील भला मोठा खड्डा माजी उपसरपंच अमित शेटगावकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन कामगारांमार्फत बुजवला.
मोरजी पंचायत क्षेत्रातील मर्डीवाडा या मुख्य रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला होता. मागच्या मे महिन्यापासून पडलेल्या खड्डय़ाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने आज पर्यंत लक्ष न दिल्यामुळे छोटा असलेला खड्डा भला मोठा झाला. या खड्डय़ाने अनेक वाहनचालकाला जखमी करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. याची गंभीर दखल स्थानिक रहिवासी तथा माजी उपसरपंच अमित शेटगावकर यांनी दखल घेऊन स्वतः कामगारा मार्फत हा खड्डा पूर्णपणे बुजवून वाहन चालकांना दिलासा दिलेला आहे.
मोरजी पंचायत क्षेत्रातील ज्या पद्धतीने मर्डीवाडा या ठिकाणी भला मोठा खड्डा पडलेला आहे त्याच पद्धतीने दाभोलकर वाडा ते गावडेवाडा पर्यंत च्या रस्त्याला जीवघेणे खड्डे पडले आहेत. याकडेही सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करताना दिसत आहेत.









