सांगरूळ / वार्ताहर
Sangrul Wrestling Competition : सांगरूळ (ता.करवीर) येथील ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी व खाडे तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि- ४ एप्रिल २०२३) रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले असल्याची माहिती संयोजक गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी दिली. या कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी व महाराष्ट्र केसरी गटात लढणाऱ्या मल्लांच्या प्रमुख तीन लढती आयोजित केल्या आहेत. यासाठी सांगरूळच्या बाजारवाडा येथे हनुमान आखाडा तयार केला आहे .
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने होणाऱ्या या कुस्ती मैदानात भैय्या केसरी किताबासाठी महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर (आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे ) विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै. बाला रफिक शेख ( हनुमान आखाडा पुणे)आणि सांगरूळ केसरी किताबासाठी उपमहाराष्ट्र केसरी पै .गणेश जगताप (काका पवार आखाडा पुणे )विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे (मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे ) या प्रथम क्रमांकाच्या दोन लढती होणार आहेत.
महाराष्ट्र चॅम्पियन पै.उमेश चव्हाण (शाहू आखाडा कोल्हापूर )विरुद्ध सेनादलचा पै.संग्राम पाटील (आमशी ) यांच्यात द्वितीय कमांकाची तर सेनादलचा पै.अभिजीत कसोटे (सांगरुळ )व पै. सचिन पाटील (शाहू आखाडा पारगाव ) यांच्यात तृतीय कमांकाची लढत होणार आहे . पै.श्रीमंत भोसले (इचलकरंजी ) व पै.बाबा रानगे (मोतीबाग ), पै. कृष्णात कांबळे (दर्याचे वडगाव )व पै . अनिरुद्ध पाटील ( आमशी ), पै. सतपाल नागटिळक (गंगावेश ), पै इंद्रजीत मगदूम (मोतीबाग ), पै. अतुल डावरे (बाणगे ), पै अमोल कोंडेकर (कुडित्रे ), पै. हृदयनाथ पाचाकटे (पाचटेवाडी ) व पै. निलेश ऐतवडे (सांगली )या प्रमुख लढती बरोबर पै. केदार खाडे पै साई सुतार पै. अनुज घुंगुरकर, पै. धैर्यशिल लोंढे, पै. यश खाडे, पै. हर्षद कापडे या स्थानिक मुलांच्या लढती आयोजित केल्या आहेत.याशिवाय शंभरावर लहान मोठ्या चटकदार कुस्त्या आयोजित केल्या आहेत.
या कुस्ती मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रा. जयंत आसगावकर, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, कुंभीचे मा. व्हा. चेअरमन निवास वातकर, जि प सदस्य बजीनाथ खाडे, सरपंच सदाशिव खाडे, आर. बी. पाटील, खत कारखान्याचे संचालक शिवाजीराव खाडे आदी उपस्थित राहणार आहेत.पत्रकार बैठकीला गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, पै. निवास वातकर, सरदार खाडे, बदाम खाडे, सचिन नाळे, दत्तात्रय मोरबाळे, विष्णू खाडे, रामदास खाडे, तानाजी खाडे यांचे सह ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी व खाडे तालीम मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









