38 लाख 33 हजार 37 मतदार : 19 लाख 36 हजार 887 पुऊष, 18 लाख 96 हजार 10 महिला
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांतील अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. असे असले तरी मतदारांची नोंदणी निरंतर सुरू राहणार आहे. सध्या जाहीर करण्यात आलेल्या मतदारयादीमध्ये जिल्ह्यातील एकूण 18 मतदारसंघांमध्ये 38 लाख 33 हजार 37 मतदार आहेत. त्यामध्ये 19 लाख 36 हजार 887 पुरुष, 18 लाख 96 हजार 10 महिला मतदार आहेत. तर इतर 140 मतदार आहेत.
सध्या जाहीर करण्यात आलेल्या मतदारयादीमध्ये 54 हजार 820 युवा मतदारांची नोंद झाली आहे. यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना मतदार नोंदणीबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यामध्ये निवडणूक केंद्रानुसार मतदारयाद्यांमध्ये अनेकांनी नोंदणी केली आहे. मतदार नोंदणी करण्यासाठी अॅपदेखील सुरू करण्यात आले आहे. व्होटर्स हेल्पलाईन अॅप sंsंsं.ऱ्न्न्एझ्.ग्ह या अॅपवर जाऊन नावे दाखल करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
नाव दाखल तसेच बदललेला पत्ता नोंद करण्यासाठी हे अॅप कायमस्वरुपी सुरू करण्यात आले आहे. 18 विधानसभा मतदारसंघांसाठी 4 हजार 434 मतदान केंद्रे करण्यात आली आहेत. यामध्ये शहरी भागासाठी 3 हजार 255 तर ग्रामीण भागासाठी 1179 केंद्रे करण्यात आली आहेत. यापूर्वी 37 लाख 88 हजार 266 मतदार होते. त्यामध्ये वाढ झाली आहे. संपूर्ण राज्यामध्येच मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यानुसार बेळगाव जिल्ह्याच्याही मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.









