वृत्तसंस्था / पतियाळा
विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीत भारताच्या महिला मल्ल अंतिम पांगलने पुन्हा एकदा आपला दर्जा सिद्ध केला. तसेच दिव्या काकरन आणि सरिता मोर यांनीही दर्जेदार कामगिरी केली.
अलिकडेच अंतिम पांगलने अमान जॉर्डनमध्ये झालेल्या नुकत्याच झालेल्या 20 वर्षांखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत 53 किलो गटात विश्व जेतेपद विश्व जेतेपद पटकाविले. त्यानंतर तिने गेल्या महिन्यात आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीमध्ये पुन्हा विजेतेपद मिळविले. यामुळे हेंगझोयू येथे 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी अंतिम पांगलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. दरम्यान 16 सप्टेंबरपासून बेलग्रेड येथे सुरू होणाऱ्या विश्व कुस्ती चॅम्पियनशील स्पर्धेसाठी अंतिम पांगलसह मंजू, पूजा जाट आणि रजनी यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
57 किलो वजन गटात सरिता मोरने या निवड चाचणी स्पर्धेत मानसी अहलावतचा पराभव केला तर दिव्या काकरणने 76 किलो वजन गटात रेल्वेच्या किरणवर मात केली. 65 किलो वजन गटात अंतिम कोंडूने बेलग्रेड स्पर्धेचे तिकीट निश्चित करताना आपल्या वजन गटात आघाडीचे स्थान मिळविले.









