क्रीडा प्रतिनिधी/ फोंडा
म्हार्दोळ येथील युनायटेड स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या फोंडा तालुका पातळीवरील फुटबॉल स्पर्धेत गजानन एफसी तळावली संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.
उपान्त्य सामन्यात गजानन एफसी तळावली संघाने एसकेएमएम खाजन वेलिंग संघावर 5-0 गोलने विजय मिळवला. जोशुआने 2 तर दादू पाटील, प्रथमेश व पीटरने प्रत्येकी 1 गोल केला. अंतिम सामन्यात तळावली संघाची लढत गोपाळकृष्ण स्पोर्ट्स क्लब माशेल यांच्याशी आज रविवार 28 रोजी सायंकाळी 5 वा. होणार आहे. नंतर होणाऱया पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहूणे म्हणून क्रीडा मंत्री गोविंद गावडे, खास निमंत्रित म्हणून वेलिंगचे जि.पं. सदस्य दामोदर नाईक, वेलिंग प्रियोळ कुंकळय़ेच्या सरपंच हर्षा गावडे, गोवा युथ कॉग्रेसचे अध्यक्ष ऍड वरद म्हार्दोळकर, क्रीडा पत्रकार नरेश गावणेकर व पंचसदस्य वैभवी म्हार्दोळकर या उपस्थित राहणार आहेत.









