फादर एडी फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : सेंटपॉल्स पोलाईटस माजी विद्यार्थी संघटना व सेंटपॉल्स स्कूल आयोजित 55 व्या फादर एडी फुटबॉल स्पर्धेच्या सोमवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंटपॉल्स संघाने केएलएसचा 5-0 तर लव्हडेलने सेंटझेवियर्सचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सेंटपॉल्स पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंटपॉल्सचा माजी ज्येष्ठ फुटबॉलपटू आशिम कामत व इतर मान्यवरांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंची ओळख करून देण्यात आली. या सामन्यात दुसऱ्याच मिनिटाला शिनन कोलकारने पहिला गोल केला. 17 व्या मिनिटाला जोसवा वाझने गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. 24 मि. शिननच्या पासवर जोसवाने 3-0 अशी आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. पहिल्या सत्रात केएलएसने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. दुसऱ्या सामन्यात सेंटपॉल्सच्या रियाने 32 व्या मिटिला तिसरा गोल केला. तर 41 मि. जोसवाने पाचवा गोल करून 5-0 ची आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सामन्यात लव्हडेल संघाने सेंट झेवियर्स संघाचा 6-0 असा पराभव केला. या सामन्यात 12 व्या मिनीटाला लव्हडेलच्या रोहित सिंगने पहिला गोल केला. 24 व्या मिनिटाला जोगेश सिंगने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी मिळविली. दुसऱ्या सत्रात लव्हडेल संघाने पुन्हा आक्रमक चढाया सुरू केल्या. 42 व्या मिनिटाला उजाझने चौथा गोल करून 49 व्या मिनिटाला व्हिनसने तर 52 व्या मिनिटाला डिनेनने सहावा गोल करून 6-0 ची आघाडी मिळवित अंतिम फेरीत धडक मारली. बक्षीस वितरणवेळी उत्तरचे आमदार राजू सेठ, फादर साईव्ह अॅब्रु व फादर साईव्हो परेरा उपस्थित राहणार आहे.
अंतिम सामाना आज : लव्हडेल सेंट्रल स्कूल वि. सेंटपॉल्स स्कूल यांच्यात दुपारी 3 वाजता खेळविण्यात येणार आहे.









