फायनल डेस्टिनेशन एक अशी फ्रेंचाइजी आहे, ज्याचे चाहते जगभरात आहेत. ही सीरिज मर्डरवर आधारित असून याचे आतापर्यंत 5 भाग आले आहेत. निर्मात्यांनी आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत सहाव्या भागाचा टीझर शेअर केला आहे. सोशल मीडियावर चित्रपटाची पहिली क्लिप व्हायरल होत आहे. टीझरची सुरुवात टॅटूच्या शॉपपासून होते. टीझरमध्ये एक युवक दिसून येतो, ज्याच्या हातावर टॅटू असतो. फायनल डेस्टिनेशन ब्लडलाइन्स स्टेफनीवर (कॅटिलिन सांता जुआन) फोकस करतो.
मृत्यूच्या चक्रापासून स्वत:ला रोखू शकणाऱ्या इसमाचा शोध लावणे हाच त्याचा एकमेव उद्देश आहे. मृत्यू या परिवाराला गिफ्टच्या स्वरुपात मिळाल्याचा संवाद टीझरच्या अखेरीस आहे. फायनल डेस्टिनेशन हा चित्रपट 16 मे रोजी हिंदी, इंग्रजीसोबत तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. आता नव्या पिढीची घाबरण्याची वेळ असल्याचे एका युजरने टीझरच्या व्हिडिओवर कॉमेंट करताना म्हटले आहे. पहिला फायनल डेस्टिनेशन चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. फायनल डेस्टिनेशन 2 चित्रपटाने 2003 साली बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. तर फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट 2006 साली प्रदर्शित झाला होता. द फायनल डेस्टिनेशन आणि फायनल डेस्टिनेशन 5 हे चित्रपट अनुक्रमे 2009 आणि 2011 साली प्रदर्शित झाले होते.









