पेडणे तालुका पत्रकार समितीतर्फे साबांखाकडे निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्मयातील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 ला जोडणाऱया सर्विस रस्त्यावरील खड्डे चतुर्थीपूर्वी बुजवावे, अशी मागणी पेडणे तालुका पत्रकार समितीने निवेदनाद्वारे पेडणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाचे अधिकारी लक्ष्मण नाईक यांनी या रस्त्यावरील खड्डे लवकरच बुजवण्यासाठी संबंधित मंत्र्यांकडून खड्डे बुजविण्यासाठी मशीन पाठविण्यात येणार आहे. ते मशीन आल्यानंतर त्वरित खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. संबंधित मशीन जरी उपलब्ध नाही झाले तरीही चतुर्थीपर्वी खड्डे बुजविण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पेडणे तालुक्मयातील ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या खड्डय़ांचा फोटोसह अहवाल सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभाग वरि÷ अधिकाऱयांपर्यंत पोहोचवल्याची माहिती लक्ष्मण नाईक यांनी यावेळी दिली.
पेडणे तालुक्मयात एकूण 20 ग्रामपंचायती आणि एक पेडणे नगरपालिका क्षेत्र याचा समावेश आहे. शिवाय तालुक्मयातून धारगळ महाखाजन ते पत्रादेवी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग 66 जात असल्याने गावाला जोडणारे सर्विस रस्ते आणि एम. डी. आर या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. हे खड्डे वाहनचालकांना धोकादायक ठरत आहे. या खड्डय़ांची स्थिती बघितल्यानंतर वाहनचालकांना खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत. आतापर्यंत अपघातात अनेक जणांचे बळी गेलेले आहेत. रस्त्याच्या या खड्डय़ांकडे सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
पेडणे तालुक्मयातील सर्व मुख्य रस्त्यावरील खड्डे आणि सर्विस रस्ते जे धोकादायक बनलेले आहेत. त्यांची डागडुजी करून आणि खड्डे बुजवावे, अशी मागणी करणारे निवेदन पेडणे तालुका पत्रकार समितीतर्फे समितीचे अध्यक्ष निवृत्ती शिरोडकर आणि सचिव महादेव गवंडी यांनी सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाला सादर केले.









