Nitesh Rane On Rahul Gandhi : ओबीसींच्या नावाने चुकीचं बोलता. मग संसदीय पद्धतीने कारवाई झाल्यावर बीजेपीच्या नावाने का बोंबलता. परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींवर कसाब प्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. आज ते कोल्हापुरात बोलत होते.
यावेळी बोलताना राणे म्हणाले की, सांगलीसह महाराष्ट्रात लँड जिहाद सुरू आहे.अनधिकृत धार्मिक स्थळ उभी करायची, डुकर कापायची जेणेकरून हिंदू तिथून निघून जातील, असा प्रकार राज्यात सुरू आहे. मुद्दा यावर कारवाईचा आहे. त्याला स्क्रिप्टेड म्हणा किंवा अन्य काही म्हणा असा हल्लाबोल इम्तियाज जलील यांच्यावर केला.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, धार्मिक वादाविषयी बोलताना ते म्हणाले की,लव्ह जिहाद विरोधात कायद्याची मागणी आम्ही करतोय. सामान्य लोकांना देखील याची माहिती व्हावी यासाठी व्याख्यान आणि प्रबोधनातून प्रयत्न केला जातोय. मुंब्रा चा जित्तूदिन आणि अबू आझमी लव्ह जिहादची आकडेवारी खोटे असल्याचा दावा करत आहेत.औरंगाबादचे नाव बदलल्यानंतर स्टेटस च्या माध्यमातून वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होतोय. तुम्ही रक्ताची भाषा करणार असाल तर आमच्याकडूनही रक्ताची भाषा होईल असा इशाराही त्यांनी दिला.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








