आमदार उदय सामंत यांची मागणी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शालेय पोषण आहाराच्या गोंधळाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार आहेत़ निकृष्ठ दर्जाच्या पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी एकप्रकारे खेळ होत आह़े त्यामुळे रत्नागिरी जिह्यात निकृष्ठ दजाचे शालेय पोषण आहार देणाऱया ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी केली आह़े
शहरातील शासकीय विश्रामगृह येथील पत्रकार परिषदेत आमदार सामंत बोलत होत़े रत्नागिरी शहरातील दामले विद्यालय, शिर्के प्रशाला व पटवर्धन हायस्कूल या ठिकाणी शालेय पोषण आहारात गोंधळ उडाल्याचे समोर आले होत़े विद्यार्थ्यांना कच्चे जेवण देण्यात आल़े तसेच जेवणातील निकृष्ठ दर्जाही समोर आला होत़ा या बाबत बोलताना सामंत म्हणाले की, पोषण आहार हा पूर्वीप्रमाणे बचतगटांना देणे आवश्यक होत़े त्यातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होणार होत़ा पोषण आहारातील जेवणाबाबत लवकरच प्रशासनासोबत चर्चा करणार असल्याचेही सामंत यांनी सांगितल़े
रत्नागिरी शहराला नगरोत्थानमधून 115 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आह़े यातून रत्नागिरी शहराच्या मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आह़े तसेच नुकतेच रस्त्यांच्या कामासाठी 20 कोटी रूपये राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आले होत़े त्यामध्ये आता 20 कोटी रूपयांचा अतिरिक्त निधी प्रशासनाकडून देण्यात येणार आह़े या निधीमधून शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण व इतर विकासकामे केली जाणार असल्याचे सामंत म्हणाले.
रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालयाला चालना मिळणार असून पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू होणार आहेत़ तसेच आंबा बागायतदारांच्या प्रशासंबंधी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आह़े लवकरच त्या संबंधी तोडगा पाडण्यासाठी निर्णय घेण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरीतील 6 रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार
रत्नागिरी शहरातील प्रमुख 6 रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आह़े यामध्ये मुख्य रस्ता, नाचणे रोड, थिबा पॅलेस रोड आदींचा समावेश आह़े यासाठी 115 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आह़े लवकरच या कामांना सुरूवात करण्यात येणार असल्याचे आमदार उदय सामंत यांनी सांगितल़े
स्वखर्चाने मोफत तिरंगा वाटप करणार
‘आझादी का अमृत महोत्सव’ असताना ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम राबवण्यासाठी लोकांकडून पैसे स्वीकारणे, हे आपल्याला पटलेले नाह़ी त्यामुळे नगर परिषद व ग्रामपंचात यांच्याकडून होणाऱया खर्चाची आपण जबाबदारी उचलणार आह़े त्यानुसार रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील लोकांना मोफत तिरंगा देण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितल़े









