लांजा तालुका वारकरी संप्रदायाची मागणी
लांजा प्रतिनिधी
लांजा तालुका वारकरी संप्रदायाच्यावतीने चुकीचे वक्तव्य करून सामाजिक व शांतता निर्माण करणाऱया सुषमा अंधारेंवर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात लांजा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
लांजा तालुका वारकरी संप्रदायाने निवेदनात म्हटले आहे, शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे सामाजमाध्यमांमध्ये हिंदू देवता व संतांवर खालच्या स्तराला जाऊन टीका करणारे व्हिडिओ पाहण्यात आले. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून सामाजिक अशांतता निर्माण करणाऱया वक्तव्यांचा जाहीर निषेध करतो. सरकारने अंधारेंविरुद्ध गुन्हा नोंद करून तत्काळ करवाई करावी. अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन देताना लांजा तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, मनोहर रणदिवे, डॉ. समीर घोरपडे, अमोल शिंदे, सुजेंद्र पालये, प्रथमेश गुरव, केतन कदम, सुभाष सावंत, उदय केळुस्कर, गोविंद चव्हाण, स्मिता दळवी, प्रियवंदा जेधे, सुभाष राणे, अमित सरदेसाई आदींसह विश्व हिंदू परिषद व इतर हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.









