अहिल्या परकाळे,कोल्हापूर
Shivaji University Research News : बदलत्या शिक्षण पध्दतीनुसार तांत्रिक बदल स्विकारताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणी येवू नयेत.‘शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली’(Augmented and Virtual Reality) विकसित केली आहे.ही प्रणाली तयार करण्यासाठी माया,ब्लेंडर,युनिटी,टीडीएस मॅक्स या सॉफ्टवेअरचा वापर करून डॉ. सुधीर देसाई आणि डॉ. वैशाली भोसले या दोन्ही संशोधक प्राध्यापकांनी तब्बल दीड वर्षे संशोधन केले आहे.संशोधनाअंती इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञानातील क्लिष्ट आकृती स्पष्टपणे थ्रीडीमध्ये पाहता यावी यासाठी ‘शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली‘ विकसित केली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना हे तंत्रज्ञान मोफत वापरता येणार असल्याने या तंत्रज्ञानाला शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्व आले आहे.
डॉ. देसाई आणि डॉ. भोसले यांनी तयार केलेले ‘शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली‘चे अॅप्लीकेशन स्मार्ट फोनमध्ये मोफत डाऊनलोड करता येणार आहे.विज्ञानाच्या पुस्तकातील आकृत्यांवर स्मार्ट फोनमध्ये डाऊनलोड केलेले अॅप्लीकेशन पकडले की थ्रीडीमध्ये आकृती स्पष्ट दिसतेय.आकृतीतील सर्व फंग्शन आणि माहितीदेखील थ्रीडीमध्ये दिसते. त्यामुळे आठवी ते दहावीच्या क्रमिक पुस्तकातील सर्वच आकृत्यांचा अभ्यास करून लक्षात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून ‘शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली‘ या प्रणालीचे स्वागत होऊ लागले आहे. ही प्रणाली तयार करण्यापूर्वी पहिल्यांदा पायलट बेसेसवर बायोलॉजी विषयावर अॅप्लीकेशन तयार केले होते. त्यानंतर सायन्स विषयांचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी ही प्रणाली तयार केली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुसुत्र पध्दतीने शिक्षण घेता यावे.यासाठी माया,ब्लेंडर,युनिटी, टीडीएस मॅक्स ही सॉफ्टवेअर वापरून ‘शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली‘ तयार केले. या प्रणालीचा नुकताच उद्घाटन सोहळा झाला असून जून 2023-24 या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष सरकारी शाळांमध्ये वापर केला जाणार आहे. या विद्यार्थी उपयोगी संशोधनासाठी तत्कालिन पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून 75 लाख 40 हजार रूपयांची देणगी देवून संशोधकांना प्रोत्साहन दिले. या आर्थिक मदतीतूनच तयार केलेल्या ‘शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली‘ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहे.भविष्यात हे तंत्रज्ञान राज्यभरातील विद्यार्थ्यांना देण्याचा संशोधकांचा मानस आहे.
क्रमिक पुस्तकातील 104 आकृत्यांचा समावेश
‘शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली‘ मध्ये आठवी ते दहावीच्या क्रमिक विज्ञान पुस्तकातील 104 आकृत्यांचा समावेश केला आहे. या आकृत्या थ्रीडीमध्ये दिसणार असून अवघड संकल्पना स्पष्ट होणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी उपयोगी संशोधन केल्याचा आनंद
शिक्षणातील बदल पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान हाताळता यावे, यासाठी ‘शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली‘ विकसित केली आहे. तांत्रिक गोष्टींसाठी डॉ. अजित कोळेकर, डॉ. सुनील रायकर, रमेश रणदिवे आणि ऋषिकेश जोशी यांनी मदत केली. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना या प्रणालीचे अॅप मोफत दिले जाईल. भविष्यात आवश्यक तांत्रिक बदल करून राज्यभरातील सर्व सरकारी शाळांना ही प्रणाली देण्याचा मानस आहे.
डॉ. सुधीर देसाई, डॉ. वैशाली भोसले (सहाय्यक प्राध्यापक, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









