लोणंद / वार्ताहर :
तांबवे ता. फलटण येथे यात्रेत ऑर्केस्टा कार्यक्रमाच्या वेळी नाचण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी दाखल झालेल्या तक्रारीत 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणंद पोलीस ठाण्यात सागर राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 6 रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास तांबवे येथे गावच्या यात्रेच्या निमित्ताने चालू असलेल्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात गावातील ऋषिकेश जगताप यास तू कार्यक्रमात उठून शिवीगाळ का करतोस, असे विचारलेच्या कारणावरून ऋषिकेश अनिल जगताप, सागर रामचंद्र पवार, (रा. चव्हाणवाडी) आबासो मोहन शिंदे, कमलेश मोहन शिंदे, महेंद्र आबासो शिंदे, गजानन संपत शिंदे, सुभाष भुजंग शिंदे, अनिकेत नंदकुमार शिंदे, ओंकार ज्ञानेश्वर शिंदे, पंकज अशोक मांढरे, अभिजीत नंदकुमार शिंदे (सर्व रा. तांबवे ) यांनी बेकायदा जमाव जमून आपसात संगणमत करून अंगावर धावून येऊन मला तसेच विशाल रमेश शिंदे, प्रदीप शिंदे, प्रदीप लक्ष्मण शिंदे, अक्षय दशरथ शिंदे, धनंजय बाळासो शिंदे, राहुल नवनाथ शिंदे, तुषार अरुण शिंदे, गणेश त्र्यंबक शिंदे यांना हाताने लाथाबुक्क्यांनी करत शिवीगाळ केली केली. तर आबासाहेब मोहन शिंदे यांनीही विरोधी तक्रार दाखल केली आहे.









