येस्क : रशियाच्या येस्क शहरातील नागरी वस्तीत एक सैन्य विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत 3 मुलांसह किमान 13 जणांना जीव गमवावा लागला आहे. घटनास्थळावरील अवशेष हटविण्याचे काम पूर्ण झाल्यावर 10 मृतदेह हाती लागले आहेत. यातील 3 मृतदेह हे मुलांचे आहेत. बचाव मोहिमेदरम्यान सुमारे 360 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून या दुर्घटनेत 68 जण गंभीर जखमी झाले आहेत. रशियाचे सुखोई-34 सुपरसोनिक लढाऊ-बॉम्बवर्षक विमान येस्क शहरातील एका इमारतीवर कोसळले. विमानाच्या इंजिनने पेट घेतल्याने दुर्घटना घडली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









