Thackeray vs. Shinde : प्रभादेवी मिरवणुकीच्या वादाचे पडसाद शनिवारी मध्यरात्री दादरमध्ये देखील उमटले. शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात शनिवारी मध्यरात्री जोरदार राडा झाला. यानंतर ठाकरे गटातील ५ जणांना काल ताब्यात घेण्यात आले आहे. राड्यावेळी आमदार सरवणकरांनी (Sada Sarvankar) हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी केला आहे. आत्तापर्यंत २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी तक्रार दिली आहे. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राड्यावेळी आमदार सरवणकरांनी (Sada Sarvankar) हवेत गोळीबार केल्याचा आरोप सुनील शिंदे यांनी केला आहे. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, पाच जणांना वैद्यकीय तपासणीसाठी दादर पोलिस घेऊन गेले आहेत.
शनिवारी सकाळी प्रभादेवी परिसरात सार्वजनिक मिरवणूक आली त्यावेळी शिंदे गटाचे समर्थक आणि आमदार सदा सरवणकर यांचे सुपूत्र समाधान सरवणकर यांच्याकडून म्याव म्याव घोषणाबाजी करण्यात आल्याने वातावरण तापले. यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते स्टेजवर आमनेसामने आल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.त्यानंतर शनिवारी मध्यरात्री दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची रस्त्यावर हाणामारी झाली, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी दावे-प्रतिदावे केले आहे. आमदार सरवणकरांनी आरोप फेटाळले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








