Fight for the right, support the organization so that the organization will raise its voice against injustice!
वेंगुर्ला येथील ‘आनंद मेळाव्यात सेवानिवृत्त प्रा. शिक्षक सावळाराम अणावकर यांचे प्रतिपादन
हक्कासाठी झटा, संघटनेला साथ द्या म्हणजे संघटना अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल असे आवाहन श्री. रुध्यम सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सावळाराम अणावकरयानी वेंगुर्ला येथील ‘आनंद मेळाव्यात केले.सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक असोसिएशन तालुका शाखा वेंगुर्लेचा वार्षिक आनंद मेळावा साईमंगल कार्यालय वेंगुर्ला येथे बुधवारी पार पडला. यावेळी संबोधताना जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर म्हणाले, हक्कासाठी झटा, संघटनेला साथ द्या, संघटनेने अन्यायाविरुद्ध लढण्याची हाक दिल्यावर सर्वांनी प्रतिसाद द्या. आपला स्वाभिमान गहाण टाकू नका. त्याचबरोबर वाचनही टाकू नका असा मोलाची सल्ला दिला.वेंगुर्ले तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या आनंद मेळाव्याचे उदघाटन जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवर उपाध्यक्ष प्रकाश दळवी, सुधाकर खानोलकर, किशोर नरसुले, ना. य. उर्फ बापू सावंत, श्नीमती मुणनकर, तालुकाध्यक्ष दिलीप प्रभु-खानोलकर, तालुका सचिव राजेंद्र बेहरे, सल्लागार सत्त्यवान पैडणेकर, माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर,, श्री. फटनाईक (सावंतवाडी), श्री भरत आवळे आदिंच्या उपस्थितीत झाले.
यावेळी 75 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा शाल श्रीफल देवून सकार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पेडणेकर (वायंगणी), श्रीमती मंदाकिनी परुळेकर, जयदेव धुरी, श्री कुडाळ्कार (निवती), श्रीमती शैलजा सातोस्कर, चंद्रकांत पेडणेकर (तुळस), सुधाकर खानोलकर यानी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. त्याचप्रमाणे सावळाराम अणावकर, प्रकाश दळवी, बापू सावंत व सेवानिवृत्त असोसिएशनचे आदर्श कार्यकर्ता पुरस्कारप्राप्त रमेश पिंगुळकर यांनाही सन्मानीत करण्यात आले.श्री. सुधाकर खानोलकर यांनी, आता उठाव करूनच मागण्या मान्य केल्या पाहिजेत. सर्व सभासदांनी सहकार्य करा असे स्पष्ट केले. तर प्रकाश दळवी यांनी मान्य झालेला मागण्यांबाबत माहिती दिली. बापू सावंत यानी आहाराबद्दल मार्गदर्शन केले. सत्कारमूर्ती चंद्रकांत पेडणेकर यानी आम्ही ‘मनोयुवा आहोत म्हणून भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दिलीप खानोलकर यानी,अहवाल वाचन राजेंद्र बेहेरे यांनी, सुत्रसंचालन कैवल्य पवार यांनी तर आभार सत्त्यवान पेडणेकर यांनी मानले.सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय सावंत, बांदवलकर गुरुजी, सौ. मोर्ये, हनुमत तेली, भिकाजी घाडी, अरुण मयेकर, दत्ताराम सावंत गुरुजी आदिनी सहकार्य केले.
वेंगुर्ले (वार्ताहर)









