प्रतिनिधी,कोल्हापूर
Ajit Pawar On Eknath Shinde : ज्यांच्या वडिलांनी शिवसेना पक्ष काढला,वाढवला. त्यांच्याकडून शिंदे गटाने पक्ष काढून घेतला.निवडणूक आयोगाने पक्ष शिंदे गटाकडे दिला असला तरी हे जनतेला पटलेले नाही.धमक असती तर त्यांनी नवीन पक्ष काढायला हवा होता.जनतेच्या मनात ‘पन्नास खोके’ बसले असून आगामी निवडणुकांमध्ये आपला पराभव होणार याची शिंदे-भाजप सरकारला जाणिव आहे.त्यामुळेच नवनवीन कारणे पुढे करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणीवर टाकल्या जात आहेत.पण जनतेच्या न्यायालयात निश्चितपणे न्याय मिळेल असा, विश्वास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला.कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला.
त्र्यंबकेश्वर, शेवगाव, औरंगाबाद अकोलामध्ये दंगली का झाल्या ?आमचे सर्वांचे दैवत असलेले बजरंग बली कर्नाटकात एकदम वर कसे आले ? कारण आजच्या राज्यकर्त्यांना जनतेसमोर जाण्यासाठी कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे जाती,धर्मात तेढ निमाण करून मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्यांवर ते बोलत नाहीत. केवळ भावनिक मुद्दा पुढे केला जात आहे. देवदर्शनासाठी जाताना पेहराव कसा असावा या मुद्यापासून ते गोमुत्र शिंपडण्यापर्यंतचे कर्मकांड सुरु आहे. महापुरुषांचा अवमान होईल असे भाषा वापरली जात आहे. सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली असून ‘चून चून के मारुंगा’ अशी वक्तव्ये केली जात आहेत. लोकशाही आणि संविधान टिकवण्याचे आव्हान आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे द्रौपदी मूर्मू यांना पंतप्रधान म्हणून संबोधित करत असतील तर दुदैव म्हणावे लागेल असे पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- Kolhapur : जिल्ह्यात भाकरी फिरवणारच -अजित पवार
पालकमंत्र्यांनी कामत नावाचा एजंट ठेवलाय
जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पैसे घेण्यासाठी कामत नावाचा एंजट ठेवलाय जिल्हा नियोजनसह प्रत्येक कार्यालयात पैसे मागितले जात असल्याचा आरोप माजी आमदार के.पी.पाटील यांनी केला.सर्वसामान्य जनतेच्या पैशांवरच हा डल्ला मारला जात आहे.त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘पन्नास खोके,एकदम ओके’ हे वाक्य पाठ करून ठेवावे.आगामी सर्व निवडणूकांमध्ये त्याचा उपयोग होणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
Previous ArticleKolhapur : जिल्ह्यात भाकरी फिरवणारच -अजित पवार
Next Article कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून नव्या चेहऱ्याला संधी








