FIFAWorldCup2022 : अर्चना बनगे,प्रतिनिधी
इराणमधील हिजाब आंदोलनाचे पडसाद विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतही उमटले. इराण सरकार विरोधातील या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी इराणच्या खेळाडूंनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला.दोहा येथील खलिफा मैदानात झालेल्या सामन्यामधील इराणच्या पुरुष संघाची ही कृती सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय बनलीय. इराणच्या खेळाडूंनी केलेले हे कृत्य त्यांना भारी पडेल का? इराण सरकार याबद्दल नेमकी कोणती भूमिका घेणार? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
खेळाडूंनी दिला गायणास नकार
इराणमधील २२ वर्षीय महिला ‘महसा अमिना’ च्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूनंतर सरकारविरुद्ध महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांनी बुरखा जाळला, केस कापत सरकारचा विरोध दर्शविला. यानंतर इराण सरकारनं अनेकांना तुरुंगात डांबल, गोळीबार केला. मात्र स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या मुद्यावरून अजूनही सरकारविरोधात आंदोलन सुरुचं आहे. या आंदोलनात पहिल्यांदाच खेळाडूंनीही जागतिक पातळीवर विरोध दर्शविला.सोमवारी इराण आणि इंग्लडच्या सामन्यावेळी इराणच्या खेळाडूंनी हिजाब विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देत राष्ट्रगीत गायणास नकार दिला. यानंतर इराणच्या चाहत्यांनीही त्यांच्या या कृतीचं सोशल मीडियाबरोबरच प्रत्यक्ष मैदानातही कौतुक केलं.एवढेच नाही तर यावेळी “इराणचे स्वातंत्र्य”असा मजकूर असलेले फलक दिसले.देशामध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी चाहत्यांनी हे फलक दर्शविले.मात्र यानंतर जेव्हा हे खेळाडू मायदेशी परततील तेव्हा त्यांच्यासह कुटुंबालाही शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त केली जातीय.
Video…तर इराणच्या खेळाडूंना अटक होण्याची शक्यता?
खेळाडूंच्या कृती विरोधात इराण सरकार कोणती भूमिका घेऊ शकत ?
अल्बानी विद्यापिठामधील आंतरराष्ट्रीय कायदे आणि मानवाधिकार विषयाचे प्राध्यापक डेव्हीड इ.गुईन यांनी या घडलेल्या प्रकारासंदर्भात न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की,इराणच्या फुटबॉल संघाने देशाचं राष्ट्रगीत न गायल्याने त्यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनाही इराणमध्ये अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यतायं.त्यांना अटकही होऊ शकते.
इराणमधील सत्ताधाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी होणारी आंदोलने चिरडून टाकताना दाखवलेली निष्ठुरता यापूर्वी जगाने पाहिलीय.विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळत असेपर्यंत खेळाडूंना सत्ताधाऱ्यांकडून कोणताही धोका नाही. मात्र जेव्हा ते इराणमध्ये परततील तेव्हा कोणत्याही खेळाडूने स्वत:च्या खासगी स्तरावर पुढे येऊन अशाप्रकारे विरोध करणं परवडणारं नाही,” असं गुईन म्हणाले.त्यामुळे खेळाडूंच्या या कृती विरोधात इराण सरकार आता कोणती भूमिका घेणार हे पाहावे लागेल.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









