लाखोंची उलाढाल : मटणाच्या तुलनेत चिकनला अधिक पसंती
प्रतिनिधी /बेळगाव
31 डिसेंबरनिमित्त शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात शनिवारी मोठ्या प्रमाणात मांसाहाराची खरेदी झाली. खवय्यांनी चिकन, मटण, मासे आणि अंडी फस्त केल्याने लाखोंची उलाढाल झाली. थर्टी फर्स्टसाठी मांसाहाराचा बेत आखला जातो. त्यामुळे मांसाहाराच्या विक्रीतून उलाढाल वाढली होती.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर यंदा निर्बंधमुक्त थर्टी फर्स्ट झाला. त्यामुळे ओल्या पार्ट्यांना पेव फुटला होता. तरुणाईकडून पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे चिकन, मटण खरेदी वाढली होती. त्याबरोबर
हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट आणि इतर ठिकाणीदेखील ग्राहकांची गर्दी वाढली होती. एकूणच शनिवारी मोठ्या प्रमाणात मांसाहारावर खवय्यांनी ताव मारला आहे. रात्री उशिरापर्यंत
हॉटेल आणि इतर व्यवसाय चालू होते. त्यामुळे व्यावसायिकांचीदेखील उलाढाल वाढली होती. त्यामुळे दोन वर्षानंतर हॉटेल व व्यावसायिकांनी समाधानकारक विक्री केली.
विक्रेत्यांकडे नागरिकांची गर्दी
शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातील चिकन, मटण आणि मासे विक्रेत्यांकडे नागरिकांची गर्दी वाढली होती. विशेषत: मटणाच्या तुलनेत चिकनला पसंती दिली जात होती. बकऱ्यांचा बाजार बंद असल्याने बकरी मिळणे अशक्य झाले आहे. परिणामी मटणाचे दर 680 रुपये झाले आहेत. त्या तुलनेत चिकनचा दर कमी असल्याने चिकनला मागणी वाढली होती. शिवाय काहींनी कौटुंबीय पार्ट्यांचेदेखील घरोघरी आयोजन केले होते. त्यामुळे मटण आणि चिकनची खरेदी वाढली होती. थर्टी फर्स्टसाठी तरुणाईकडून मांसाहाराचा बेत आखला जातो. त्यामुळे मांसाहाराला मागणी वाढली होती.
800 ते 1000 किलो मटणाची विक्री
थर्टी फर्स्टनिमित्त शहरात मटणाची विक्री वाढली होती. 800 ते 1000 किलो मटणाची विक्री झाली आहे. विशेषत: मटणापेक्षा चिकनची विक्री अधिक झाली. मटणाचा दर अधिक असल्याने खवय्ये चिकनकडे वळले. मात्र, दोन वर्षानंतर यंदाच्या 31 डिसेंबरला उलाढालही वाढली.
– उदय घोडके (मटण शॉप असोसिएशन अध्यक्ष)









