वेंगुर्ले (वार्ताहर)-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आरवली येथील श्री वेतोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार २ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानिशी संपन्न होणार आहे. या जत्रोत्सवा दिवशी रात्री श्रींची पालखी, दारु-सामान आणि फटाक्यांची आतषबाजी व दशावतारी नाट्यप्रयोगही होणार आहे. तर दुसऱ्या दिवशीही मंगळवार ३ डिसेंबर रोजी सकाळी तुलाभार, गुणीजन गायन गौरव कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी श्री देवी सातेरीचाही वार्षिक जत्रोत्सव असल्यामुळे तिथेही रात्री देवीची पालखी प्रदक्षिणा, दारुसामान आतषबाजी व दशावतारी नाटक यांचे आयोजन केलेले आहे. आरवलीच्या श्रीदेव वेतोबाच्या श्रीदेवी सातेरीच्या दर्शनाचा लाभ व जत्रोत्सवाचा लाभ तमाम भाविकांनी घ्यावा असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.
Previous Articleबांदेश्वर मंदिरात २ डिसेंबरला दीपोत्सवाचे आयोजन
Next Article अमूर ससाण्याचा 13 दिवसात 7,300 किलोमीटरचा प्रवास









