वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी क्रिकेट न्यूझीलंडने 15 जणांचा संघ जाहीर केला असून लॉकी फर्ग्युसनकडे पहिल्यांदाच कप्तानपदाची धुरा सोपवली आहे.
लॉकी फर्ग्युसनला पहिल्यांदाच न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद मिळत आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन उपलब्ध राहणार नसल्याने त्याच्या जागी फर्ग्युसनची निवड करण्यात आली आहे. त्याप्रमाणे न्यूझीलंडचा उपकर्णधार टॉम लेथम काही वैयक्तिक अडचणीमुळे बांगलादेशच्या दौऱ्यावर जाऊ शकणार नाही. या आगामी मालिकेसाठी डीन फॉक्सक्रॉप्ट या नवोदित चेहऱ्याला संधी दिली आहे. त्याचप्रमाणे मार्क चॅपमन व निशम बांगलादेशच्या दौऱ्यासाठी उपलब्ध राहणार नाहीत.
न्यूझीलंड वनडे संघ : लॉकी फर्ग्युसन (कर्णधार), अॅलेन, ब्लंडेल, बोल्ट, बोवेस, क्लेव्हर, फॉक्सक्रॉप्ट, जेमिसन, मॅकोन्ची, मिलेनी, निकोल्स, रचिन रविंद्र, सोधी, टिकनेर आणि विल यंग.









