न्हावेली /वार्ताहर
गुळदुवे गावातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्वच्छ गाव,सुंदर गाव या उपक्रमांतर्गत गुळदुवे ग्रामपंचायत च्या वतीने दिनांक ११जुलै रोजी सत्कार करण्यात आला.यावेळी प्रास्तविक बोलताना उपसरपंच श्री अशोक धर्णे यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करून,कुठल्याही विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत हवी असल्यास आपण ती मदत करणार असल्याचे यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोंदा हायस्कूल,चे निवृत्त माजी मुख्याध्यापक श्री .अरुण धर्णे यांनी उपस्थित विद्यार्थांना मोबाईल बाबत चे फायदे व दुष्परिणाम या बाबत योग्य असे मार्गदर्शन केले तसेच मोबाईल चा अतिरेक टाळण्याबाबत आवाहन केले.मराठी माध्यमातून आपल शिक्षण झालं तरी आपण मोठ्या हुद्यापर्यंत मजल मारू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगून उपस्थित विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सरपंच शैलेंद्र जोशी यांनी मुलांच्या यशाबद्दल कौतुक केले. कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत तर्फे नारळ रोप,सुपारी रोप,गुलाब पुष्प तसेच मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.गुळदुवे प्राथमिक शाळा नं.२ येथे हा कार्यक्रम पार पडला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांची प्रशंसा केली.विद्यार्थ्यांनी सुध्दा आपली मनोगत व्यक्त करून ग्रामपंचायत चे आभार मानले.
यावेळी गावचे सरपंच श्री. शैलेंद्र जोशी,उपसरपंच श्री अशोक धर्णे, माजी मुख्याध्यापक अरुण धर्णे,बाबी धर्णे,ग्रामपंचायत सदस्य सुधीर जोशी,राजश्री जोशी, श्रध्दा सावंत,दिपगौरी मामलेकर ,शिक्षक रमेश गावडे, ग्रामविस्तार अधिकारी स्वप्ना बगळे,तसेच रुपेश धर्णे,गणपत कारेकर,मिलिंद नाणोसकर, मदन मुरकर ,सीआरपी संगीता जोशी,किशोरी केदार, आशा स्वयंसेविका सरिता शेटकर संतोष सावंत,कर्मचारी अनिल शेटकर ,विद्यार्थी,पालक आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्वप्ना बगळे यांनी मानले.









