Summer Nutritious Ladoo Recipe : उन्हाळा सुरु झाला आहे. सकाळी वातावरणात गारवा तर दुपारी कडक ऊन यामुळे आरोग्यावरही याचा परिणाम जाणवू लागला आहे. सतत थकवा येणे, भूक न लागणे, काम करण्याची इच्छा नसणे अशा अनेक तक्रारी सुरु झाल्या आहेत. यासाठी पाणी पिणे , ड्रायफूड खाणे, खाण्यात फळांचा वापर करणे अशा छोट्या टिक्स आपण सगळेच करतो. मात्र प्रत्येक वेळी हे खाण शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही रोज एक पौष्टिक लाडू खाल्ला तर तुम्ही या समस्यांपासून दूर राहू शकता. हा पौष्टिक लाडू कसा बनवायचा चला जाणून घेऊया.
साहित्य
शेंगदाणे-पाव वाटी
तीळ-पाव वाटी
खिसलेले सुक खोबर- पाव वाटी
तुप- अर्धी वाटी
बदाम- 7 ते 8
पिस्ते-7 ते 8
अक्रोड- 7 ते 8
खजूर- अर्धी वाटी
गुळ- आवडीनुसार
कृती
सुरवातीला कढईत शेंगदाणे भाजून घ्या. त्यानंतर तीळ आणि सुके बारीक केलेले खोबरे भाजून घ्या. यानंतर एक-एक करत बदाम, पिस्ता, अक्रोड थोड-थोड तूप घालून भाजून घ्या. यानंतर मिक्सरमधून खजूर बारीक करून घ्या. आता बारीक झालेले खजूर कढईत दोन चमचे तुप घालून भाजून घ्या. हे सर्व मिश्रण गार झाल्यानंतर सर्व ड्रायफ्रूट, शेंगदाणे, तीळ मिक्समधून बारीक करून घ्या. बारीक झालेली पुड, खजूर आणि किसलेला गुळ एकत्र करा. यामध्ये दोन चमचे तुप घालून लाडू वळून घ्या. यावर तुम्ही काजू किंवा बदाम लावू शकता.
टीप- उन्हाळ्यात येणारा थकवा कमी करण्यासाठी या लाडूची तुम्हाला नक्कीच मदत होईल.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









