डिजिटल प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरशिप असावी अशी मागणी करून मनोरंजन क्षेत्रात ‘स्वच्छ आशय’ नेहमीच प्रभावी काम करतो बॉलीवूडचा भाईजान सलमान खान यांने आपले मत व्यक्त केले. आपल्या करियरच्या वाटेवर पडत्या काळात अनेक अभिनेत्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा
सहारा घेतला असला तरी पण सलमान खानने अजूनही ओटीटीला दुर ठेवले आहे.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सलमान म्हणाला, “मला अगदी खरोखर वाटत आहे की या ओटीटी माध्यमावर सेन्सॉरशिप असायला हवी. या प्लॅटफॉर्मवरिल सर्व…अश्लीलता, नग्नता, शिवीगाळ थांबली पाहिजे. 15 किंवा 16 वर्षांची लहान मुलेही ते पाहत आहेत. आपल्या कुटुंबातील तरुण मुलीने ते पाहिले तर तुम्हाला आवडेल का? मला वाटते की OTT वरील आशय तपासला गेला पाहिजे. कंटेंट जितका स्वच्छ असेल तितकि त्याला दर्शक असतील.”
पुढे बोलताना सलमान म्हणाला, पडद्यावर ‘या गोष्टी’ करणार्या कलाकारांबद्दल बोलताना सलमान म्हणाला, “तुम्ही हे सर्व ओटीटीवर केले आहे. खुलेआम प्रेम करणे, चुंबन घेणे आणि दृश्यांमध्ये स्वताला एक्सपोज करणे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्या चौकीदारानेही तुमचे काम पाहिलेले असते. मला या सर्व गोष्टी असुरक्षित वाटतात. त्यामुळे मी हे करत नाही.
शेवटी बोलताना तो म्हणाला, ” आपण हिंदुस्तानात रहतो. पहिल्यांदा या सर्व गोष्टी चांगल्या वाटत होत्या. पण त्यानंतर त्याचा अतिरेक झाला. पण अलिकडे त्यावर नियंत्रण येत आहे. लोक आता बर्याच चांगल्या, सभ्य आणि स्वच्छ आशयावर काम करत आहेत.”









