वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
व्याजदरवाढीचा भारतीय उद्योगावर प्रतिकूल परिणाम होत असून आगामी काळात व्याजदरात कमीत कमी कपात करण्याची गरज असल्याचे मत भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय)व्यक्त केले आहे.
चालू आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने 1.9 टक्के इतकी व्याजदरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँक पतधोरण समितीची 5 तारखेपासून सुरु झाली असून ती 7 डिसेंबरपर्यंत होणार आहे. 7 रोजी समिती व्याजदर वाढीबाबत निर्णय घेऊ शकते. याअनुषंगाने सीआयआयने आपले मत नोंदवले आहे.
चालू आर्थिक वर्षात दुसऱया तिमाहीत कंपन्यांच्या नफा कमाईत घट झाली आहे. जागतिक स्थिती अनिश्चित असली तरी भारतीय आर्थिक स्थिती चांगली असल्याचा निर्वाळा सीआयआयने दिला आहे.
सोन्याची आयात चालू आर्थिक वर्षात पहिल्या 7 महिन्यात 17 टक्के घटून 24 अब्ज डॉलरची राहिली आहे. मागच्या आर्थिक वर्षात आयात 29 अब्ज डॉलर्सची राहिली आहे. ऑक्टोबर महिन्यात सोन्याची आयात 3.7 अब्ज डॉलरची राहिली आहे. चांदीची आयात घटून 58.5 कोटीची राहिली आहे.
एफएमसीजी कंपन्यांना येतील अच्छे दिन…
एफएमसीजी कंपन्यांच्या वस्तू विक्रीत वाढ राहण्याचा अंदाज बांधला जात आहे. थंडी जसजशी वाढत जाईल तशतशी वस्तुंची मागणी वाढत जाईल. डाबर, इमामी व मॅरिकोसारख्या कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री दमदार राहिली आहे. त्वचेची काळजी घेणारी उत्पादने व मध तसेच च्यवनप्राश सारख्या उत्पादनांना मागणी अधिक राहिली आहे. दुसरीकडे पिक यंदा चांगले आले असून तुलनेने महागाईही कमी राहिली आहे. बॉडी लोशनची मागणी 50 टक्के अधिक राहिलीय.









