नवी दिल्ली
फेडरल बँकेचा आर्थिक वर्ष 2022-23 मधील एप्रिल ते जून तिमाहीमध्ये निव्वळ नफा हा 64 टक्क्यांनी वधारुन तो 600.66 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे, अशी माहिती बँकेने शुक्रवारी दिली आहे.
खासगी क्षेत्रातील कर्जदाता बँकेने आर्थिक वर्ष 2021-22 जून तिमाहीत 367.29 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. बँकेचा मागील तिमाहीत (जानेवारी-मार्च) शुद्ध नफा 540.54 कोटी रुपये होता. फेडरल बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2022-23 एप्रिल ते जून तिमाहीच्या दरम्यान यांचे एकूण उत्पन्न वधारुन 4,081.48 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे एनपीए 30 जून 2022 पर्यंत घटून 2.69 टक्क्यांवर पोहोचले आहे.
एनपीएचे कर्ज घटून 4,155.33 कोटी रुपयांवर राहिले असल्याचे सांगितले जात आहे.









