नवी दिल्ली
समान नागरी संहितेवरून (युसीसी) केंद्र आणि भाजपशासित राज्यांमधील सरकार सक्रीय झाले आहे. उत्तराखंडमध्ये सर्वप्रथम युसीसी लागू होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान काँग्रेसच्या खासदाराने यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. युसीसीमुळे विविध समुदायांना मिळालेल्या अधिकारांचे उल्लंघन होऊ शकते असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. सरकारच्या प्रस्तावात नेमके काय हे हे आम्हाला पहावे लागेल. सरकारने अद्याप मसुदा मांडलेला नाही. तसेच संबंधित घटकांसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा सुरू केलेली नाही. हिंदू कोड बिल आणण्यासाठी स्वातंत्र्यानंतर 9 वर्षे लागली होती. याचमुळे लोकांना समजाविण्यास वेळ लागतो असे उद्गार थरूर यांनी काढले आहेत.









