सरुड वार्ताहर
सरुड: सावे ( ता. शाहूवाडी) येथे रविवारी दिवसभर पिसाळलेल्या कुत्र्याने चार लोकांचा चावा घेतला. शिवाय गावातील पंधरा हून अधिक अन्य कुत्र्यांना देखील चावल्याने दिवसभर गावात घबराटीचे वातावरण होते. त्यामूळे सावेसह भैरेवाडी परिसरात दिवसभर धुमाकूळ येथील दैनंदिन जीवनावर चांगलाच परिणाम झाला.
सविस्तर वृत्त असे की,सावे येथे घरी पाळलेल्या कुत्र्याने मालकालाच चावा घेतला. त्यानंतर दिवसभर गावातील चार लोकांना देखील चावा घेतला. सैरभैर झालेले कुत्रे पुन्हा आक्रमक बनले आणि गावातील सुमारे पंधराहून अधिक मोकाट कुत्र्यांना देखील चावले आहे. जखमी लोकांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार घेतले आहेत.
हेही वाचा- ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर इचलकरंजीत आता खो-खो खेळही
पिसाळलेल्या कुत्र्याची बातमी वाऱ्यासा२खी परिसरात पसरल्याने सावर्डे खुर्दसह, भैरेवाडी गावातून देखील घबराटीचे वातावरण पसरले होते. पिसाळलेल्या कुत्र्याच्या दहशतीने अनेक विदयार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवल्याने सोमवारी शालेय कामकाजावर देखील परिणाम जाणवला. सावे गावातील तरुणवर्ग दिवसभर कुत्र्याच्या मागावर होता परंतु दिवसभर सापडले नाही. सोमवारी सकाळी भैरेवाडी गावात कुत्र्याला मारल्याने ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा श्वास सोडला.