पूर्ण पृथ्वीवर पसरलाय मानवी डीएनए
जर तुमच्या डीएनएशी संबंधित पूर्ण तपशील कुणी ब्लॅक मार्केटमध्ये विकल्यास काय होईल? आमचे गळणारे केस, त्वचेचा भाग, थूंक इत्यादी सर्व गोष्टींमध्ये पेमिकल कोड असतात, जे आमच्या शरीराचे कार्य चालविण्यास मदत करतात. अशा स्थितीत जगभरात फैलावलेल्या डीएनएचा गैरवापर कुणीतरी करू शकतो अशी भीती वैज्ञानिकांना सतावू लागली आहे.
एका नव्या अध्ययनानुसार तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, मानवी डीएनए हवा, पाणी किंवा जमिनीवरून मिळविता येतो. अशा स्थितीत लोकांचे वैयक्तिक तपशील चुकीच्या हातांमध्ये जाण्याची भीती आहे. अशाप्रकारच्या मोठ्या चोरीसाठी पूर्ण जग आणि मानव तयार नाही. तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत होत चालले आहे, तंत्रज्ञान समाजाच्या लाभासाठी असते, परंतु ते चुकीच्या हातांमध्ये पडल्यास याचे नुकसान सर्वांनाच झेलावे लागते असे युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडातील जूलॉजिस्ट डेव्हिड डफी यांनी म्हटले आहे.

जगभरात फैलावलेल्या डीएनएवरून वाढत असलेली चिंता सर्वांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरच यासंबंधी धोरणे आणि नियम तयार करता येणार आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावर वृक्ष-रोपं, प्राणी आणि मानवी डीएनए विविध माध्यमांतून फैलावलेले आहेत. त्यांना वैज्ञानिक ‘ई डीएनए’ म्हणजेच एन्व्हॉयरन्मेंटल डीएनए’ म्हणतात.
ईडीएनएचा छोटासा तुकडा जरी हस्तगत झाला तरी त्याचे सिक्वेंसिंग करून पूर्ण इकोलॉजीच्या जीवांचा इतिहास मिळविता येईल इतपत तंत्रज्ञान विकसित झाले आहे. तसेच संबंधित ठिकाणी कुठले जीव अस्तित्वात आहेत हे देखील शोधून काढता येऊ शकते. संबंधित डीएनए कुठल्या जीवाचा आहे, त्याच्या आसपासच्या लोकसंख्येत कुठल्या प्रकारचे आजार फैलावले आहेत, लोकसंख्येचा आजारासोबत कशाप्रकारचे नाते आहे, कुठल्या प्रकारचे संक्रामक रोग टिकले आहेत हे सर्वकाही शोधून काढता येणार आहे.
याचे सर्वात मोठे उदाहरण प्राचीन सागरी राक्षस लॉच नेसचा डीएनए शोधण्याचा प्रयत्न होता. परंतु तो शोधण्याच्या नादात आणखी अनेक शोध लागते. यातून जेनेटिक सिक्रेट्स लोकांना कळली, डीएनए सिक्वेसिंगच्या जुन्या पद्धती अत्यंत जटिल होत्या, परंतु आता ईडीएनएच्या सिक्वेंसिंगला शॉटगन सिक्वेंसिंग म्हटले जाते.
या कामा डेव्हिड मफी अन् त्यांच्या पथकाला प्रावीण्य प्राप्त आहे. या टीमने आयर्लंडमधून पाणी आणि वाळूचे नमुने मिळविले. हे नमुने फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या व्हीटनी लेबोरट्री फॉर मरीन बायोसायन्सेस अँड सी टर्टल हॉस्पिटल येथे नेण्यात आले, मानवी वस्तीपासून दूर असलेल्या भागातून हे नमुने मिळविण्यात आले होते. या नमुन्यांचे अध्ययन केले असता त्यात मानवी डीएनएचे अवशेष आढळून आले आहेत. हवेतून मिळविलेल्या नमुन्यांमध्येही ईडीएनए मिळाला आहे. अशाप्रकारचा डीएनए नमुना मिळवून त्याचा गैरवापर कुणी केला तर किती नुकसान होईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही असे डेव्हिड यांनी म्हटले आहे. यासंबंधीचे अध्ययन नेचर इकोलॉजी अँड इव्होल्युशनमध्ये प्रसिद्ध झाले आहे.









