नवीन संग्रहालय इमारत लवकरात लवकर ताब्यात देण्याची मागणी
प्रतिनिधी/ सातारा
मागील काही दिवसांपासून श्री. छ. शिवाजी महाराज संग्रहालयात संवर्धनाचे काम सुरू आहे. या संग्रहालयात अनेक ऐतिहासिक वस्तुंचे जतन करण्यात आले आहे. जवळपास 100 ते 400 वर्षाहुन अधिक कालावधी पूर्वीची शस्त्रs, वस्त्रे व पेंटींग या संग्रहालयात उपलब्ध आहेत. या संग्रहालय स्थापनेस 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. याकरिता नुतन इमारतीची निर्मिती करण्यात आली आहे. पण येथे कोरोना काळात जंम्बो कोविड सेंटर उभारण्यात आल्याने ही इमारत अद्याप हस्तांतरित करण्यात आली नाही. पावसामुळे संग्रहालयातील वस्तु खराब होत असल्याने लवकरात लवकर नुतन इमारत हस्तांतरीत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
या संग्रहालयात तख्त (साताऱयाची गादी), या संबंधीच्या सर्व वस्तु, 17 मिनिचर पेंटींग, सोन्याची जर असलेल्या रेशमी साडय़ा, पैठणी साडय़ा, कापडी चिलखत आदींसह इतर अंगवस्त्रांचे आहेत. सध्याची संग्रहालयाची जागा अपुरी पडत आहे. त्यातच पावसाच्या गळतीमुळे येथील पुरातन वस्तु ही खराब होण्याची भीती ही नाकारण्यात येत नाही. त्याचप्रमाणे नवीन संग्रहालय अंतर्गत फर्निचर करणे करीता 3 कोटीची निविदा ही निघाली आहे. ते सुद्धा काम सुरु करावयाचे आहे त्याचप्रमाणे सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे गळतीमुळे संग्रहालयात दुर्गंधी येत असून येणारे प्रेक्षक नाराज होत आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने जंम्बो कोव्हिड सेंटर हे बंद आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी जंम्बो कोव्हिड सेंटर करीता घेतलेली संग्रहालयाची इमारत त्वरित हस्तांतरित करण्यात यावी. जेणेकरून पुरातन वस्तुंची निगा योग्यप्रकारे राखता येईल. प्रेक्षकांना ही संग्रहालयास भेट देऊन येथील माहीती घेता येईल.
हवेतील आर्दतामुळे वस्तू खराब होऊ लागल्यात
सध्या संग्रहालयात 16 ते 18 व्या शतकातील शस्त्र, वस्त्रs, चित्रे यांचे हवेतील आर्द्रता सूक्ष्म किटक यांच्यामुळे या वस्तु खराब होऊ नये म्हणून पुरातत्व विभाग मुंबईचे संचालक गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ कर्न्झवेशन टीमकडून वस्तू संवर्धनाचे काम चालू आहे.