कायमस्वरुपी उपाययोजना करा : सामाजिक कार्यकार्ते शंकर पोळजी, सूर्यकांत चोडणकर यांची मागणी
पेडणे : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू असून मालपे येथे दरड कोसळल्याने या भागातून वाहन चालविताना वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संध्या राष्ट्रीय महामार्ग 66 क्रमांक या रस्त्याचे काम मालपे येथे सुरू आहे. या ठिकाणी वारंवार दरड कोसळण्याचे प्रकार घडत असल्याने कायमस्वऊपी उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक तथा सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी आणि सूर्यकांत तोरस्कर यांनी केली आहे. मालपे चढणीवर सध्या महमार्गाचे काम सुरू आहे. येथील दरड पावसात कोसळत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यातच सर्व्हिस रोडचा पत्ता नसल्याने या परिसरातून चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. अचानक दरडी कोसळण्याचा धोका असूनही येथे कोणत्याही सूचना फलक लावलेले नाहीत, असे सूर्यकांत चोडणकर यांनी सांगितले.
सर्व्हिस रोड बनले धोकादायक!
राष्ट्रीय महामार्ग बाजूचे सर्व्हिस रोड मृत्यूचा सापळा बनला आहे. पेडणे येथे सर्व्हिस रस्त्यासाठी घातलेली भरावाची माती वाहून आली. सरकारी अधिकारी यांचे या कामावर दुर्लक्ष झाले. रस्त्याच्या कामाबाबत स्थानिक पंच, सरपंच यांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे, असे शंकर पोळजी म्हणाले.









