मोठय़ा प्रमाणात कालबाहय़ मावा जप्त : मावाची सोनसोडय़ावर लावली विल्हेवाट
प्रतिनिधी / मडगाव
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एफडीएने कारवाईचे सत्र सुरू ठेवले असून शांतीनगर-मडगाव येथील मिठाई विपेते, मेसर्स श्री कांतीलाल प्रजापत (उत्पादन युनिट) यांच्या बेकरीची तपासणी करण्यात आली. या तपासणीत सुमारे 590 किलो मावा जप्त करण्यात आला. या मावाची किंमत 1,20,000 होत असल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱयांनी दिली आहे.
गोव्यात सर्रासपणे कालबाहय़ झालेला मावा वापरून मिठाई तयारी केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेश चतुर्थीच्या काळात सुद्धा असाच प्रकार घडला होता. पण, त्यावेळी याकडे कुणीच गांभीर्याने पाहिले नव्हते. मात्र दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एफडीएने कारवाईला सुरवात केली असून या कारवाईचे स्वागत होत आहे. जप्त करण्यात आलेल्या मावाची सोनसोडय़ावर मडगाव नगरपालिकेच्या सहकार्याने विल्हेवाट लावण्यात आली.
नावेली-मडगाव येथील बेंगलोर बेकरी (उत्पादन युनिट) अस्वच्छ परिस्थितीमुळे बंद करण्यात आली. तसेच आकें येथील बंगलोर अय्यंगार बेकरी (उत्पादन युनिट) यांच्याकडे एफडीएचा परवाना नसल्याने ती बंद करण्यात आली.
डीके बेकरीची एफडीएच्या अधिकाऱयांनी तपासणी केली व योग्य लेबल न लावल्यामुळे सुमारे 2790/-रूपयांचा माल जप्त करण्यात आला. शांतीनगर आकें-बायश येथील मोहन आणि खाद्यपदार्थांचीही तपासणी करण्यात आली आणि 9 किलो मिसब्रँडेड मिश्रित फरसाण ताब्यात घेण्यात आले. या फरसाणची किंमत रु. 2500 होत आहे.
कारवाई करणाऱया एफडीएच्या टीममध्ये रिचर्ड नोरोन्हा (नियुक्त अधिकारी) अबेल रॉड्रिग्स (एस. एफएसओ), राजीव कोरडे (एस. एफएसओ) अमित मांदेकर, स्नेहा नाईक, अभिषेक नाईक, (एफएसओ) साईनाथ मांदेकर, रामा गावकर, गौरेश गावकरगावकर (एमटीएस) व संदीप शेळके (चालव) यांचा समावेश होता.









