बेळगाव :
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड टॅक्स प्रॉक्टिशनर्स इंडिया (आयसीटीपीआय) तर्फे बळ्ळारी येथील भारतीतीर्थ सभागृहात राष्ट्रीय कर परिषद व चार्टर्ड टॅक्स प्रॅक्टिशनर्सचा तिसरा दीक्षांत समारंभ नुकताच झाला. यामध्ये बेळगावचे आतिश बाळासाहेब फगरे यांना प्रतिष्ठित फेलो चार्टर्ड टॅक्स प्रॅक्टिशनर (एफसीटीपी) प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीटीपीआर श्रीधर पार्थसारथी होते. आयसीटीपीआय सीपीएचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. एम. ताशीलदार, आयसीटीपीआयचे मुख्य अधिकारी वसंत एन. लडावा, सीसीएम जगदीश शेट्टर आदी उपस्थित होते. आतिश फगरे यांना सीए शिवकुमार शहापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.









