29 ऑक्टोबरपर्यंत बोली लावता येणार : कंपनी बांधकाम, तेल आणि वायू क्षेत्रात कार्यरत
वृत्तसंस्था/ मुंबई
वाहतूक, बांधकाम, तेल आणि वायू क्षेत्रात कार्यरत असलेल्या एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) शुक्रवारी खुला झाला आहे. या इश्यूसाठी गुंतवणूकदार 29 ऑक्टोबरपर्यंत बोली लावू शकतात. कंपनीचे शेअर्स 4 नोव्हेंबर रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध केले जातील.
कंपनीला या इश्यूद्वारे 5,430 कोटी रुपये उभे करायचे आहेत. यासाठी कंपनी 1,250 कोटी रुपयांचे 2,69,97,840 ताजे शेअर्स जारी करत आहे. तर, कंपनीच्या विद्यमान गुंतवणूकदारांनी 4,180 कोटी रुपयांचे 9,02,80,778 शेअर्स ऑफर फॉर सेल म्हणजेच ओएफएसद्वारे विकले.
किमान आणि कमाल ठेव रक्कम किती आहे?
एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या इश्यूची किंमत 440 रुपये ते 463 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच 32 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. आयपीओ 463 रुपयेच्या वरच्या प्राइस बँडनुसार 1 लॉटसाठी अर्ज केल्यास, त्याकरीता रु. 14,816 मोजावे लागतील. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी म्हणजेच 416 शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. यासाठी, गुंतवणूकदारांना वरच्या किंमतीच्या
ब्रँडनुसार 1,92,608 गुंतवणूक करावी लागणार आहे.
इश्यूचा 35 टक्के हिस्सा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. कंपनीने पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी इश्यूचा 50 टक्के राखीव ठेवला आहे. याशिवाय, सुमारे 35 टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे आणि उर्वरित 15 टक्के हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. कॉर्पोरेट उद्देशांसाठी कंपनी 600 कोटी रुपये खर्च करणार आहे.









