एफसी गोवाचे चेन्नईनवर तीन गोल; पहिल्या स्थानावर विराजमान
मडगांव : एफसी गोवाने आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आपला चौथा विजय साकारला, काल चेन्नईन नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या लढतीत एफसी गोवाने चेन्नईन एफसीचा 3-0 असा आरामात पराभव केला. या विजयाने एफसी गोवाला 3 गुण प्राप्त झाले. चार विजय व एका बरोबरीने ते आता 13 गुणांनी पहिल्या स्थानावर विराजमान झाले आहेत. एफसी गोवासाठी बोरीस सिंगने सामन्याच्या 13व्या मिनिटाला गोल करून आघाडी घेतली. त्यानंतर 24व्या मिनिटाला कार्ल मॅकह्यूजच्या पासवर रॉवलीन बॉर्जिसने एफसी गोवाचा दुसरा गोल केला. दुसऱ्या सत्रात उदांता सिंगने एफसी गोवाचा तिसरा गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईन एफसीचे आता 6 सामन्यांतून 6 गुण झाले असून ते सातव्या स्थानावर आहेत.









