क्रीडा प्रतिनिधी/ मडगांव
एफसी गोवाने भारताच्या आंतरराष्ट्रीय बचावपटू (विंगर) उदांता सिंग याला अनेक वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. आगामी 2023-24 सीझनची तयारी करताना आपला सहकारी आणि राष्ट्रीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू रॉवलीन बॉर्जिस याला लोनवर करारबद्ध केल्यानंतर इंडियन सुपर लीगमधील सर्वोत्तम कामगिरीने उदांताच्या आगमनाने एफसी गोवाला आणखी बळ मिळाले आहे.
एफसी गोवाचा भाग बनल्याबद्दल मी खूप उत्साहीत आणि सन्मानीत आहे, असे उदांता सिंग करार केल्यानंतर म्हणाला.एफसी गोवाच्या खेळाचे मी नेहमीच कौतुक केले आहे. आम्ही गोव्यात खेळत होतो तेव्हा त्यांचा खेळ आणि तंत्राचा सामना करण्यासाठी नेहमीच थोडा जास्त वेळ लागतो. आमच्याकडे एकत्र काम करण्यासाठी अधिक काळ आहे. मला विश्वास आहे की माझ्याकडे बरेच काही आहे आणि त्यांची स्वप्ने आणखी खूप चषक जिंकण्याची आहेत. त्याची सुरूवात एफसी गोवाकडून होईल, असे उदांता सिंग म्हणाला.
प्रतिष्ठतेच्या टाटा फुटबॉल अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या उदांता सिंगने 2017-18 मध्ये इंडियन सुपर लीगमध्ये जाण्यापूर्वी सुरूवातीला आय-लीगमध्ये बेंगलोर एफसी सीनियर स्तरावरील फुटबॉल कारर्कीद व्यतीत केली. आय-लीग आणि आयएसएल, ड्युरँड कप, सुपर कप आणि फेडरशनकप यासारख्या राष्ट्रीय लीगमध्ये त्याने बेंगलोरसाठी 200हून अधिक सामने खेळले आहेत आणि प्रत्येक स्पर्धा एकदा जिंकण्यात मोलाचे योगदान दिले आहे. याशिवाय 27 वर्षीय उदांता सिंगने एएफसी चषक स्पर्धेत 26 सामने खेळले आहेत.
बेंगलोर एफसीसाठी खेळताना उदांता सिंगच्या नावावर 22गोल आहेत. शिवाय तितकेच गोल करण्यात त्याने मोलाचे असिस्ट केले आहे. आजवरच्या भारतातील सर्वोत्कृष्ट बचावपटूपैकी एक म्हणून तो ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीचा विचार करता उदांताने 2016 मध्ये राष्ट्रीय पदार्पण केले. तेव्हापासून तो राष्ट्रीय संघाचा एक महत्वाचा भाग आहे. आजपर्यंत देशासाठी तो 36 सामने खेळला आहे. या खेळाडूने 2019 एएफसी आशियाई चषक 2018 इंटरकॉन्टिनेंटल कप व 2021 एफएएफएफ चॅम्पियनशीपमधील संघाच्या विजयी मोहिमेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अफलातून वेग व थेटपणे चेंडूवर ताबा घेत एफसी गोवाच्या खेळात आणखी एक गतिमानता आणण्यादृष्टीने उदांता याचा क्लबमधील रोल महत्वाचा असेल.









