कॉमेडी ड्रामा चित्रपटात करणार अभिनय
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ‘सितारे जमीन पर’सोबत बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात अभिनय करण्यासोबत याची निर्मिती देखील करणार आहे. याचबरोबर आमिर आणखी अनेक चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. यातील एका चित्रपटात तो दंगल या चित्रपटामधील सह-कलाकार फातिमा सना शेखसोबत दिसून येणार आहे.

आमिर आणि फातिमाने 2016 मध्ये ‘दंगल’ या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात हीट चित्रपट ठरला होता. आमिरने आता फातिमा सना शेखला स्वत:कडून निर्मित होणाऱ्या नव्या चित्रपटासाठी करारबद्ध केले आहे. सध्या या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. परंतु या चित्रपटात फातिमासोबत आणखी काही कलाकार दिसून येणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी अद्वैत चंदन पार पाडणार आहेत. यापूर्वी त्यांनी ‘सुपरस्टार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आमिर खान यापूर्वी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात करिना कपूरसोबत दिसून आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला होता.
तर आमिरचा ‘सितारे जमीन पर’ हा स्पॅनिश चित्रपट ‘कॅम्पियोन्स’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात आमिरसोबत जेनेलिया देशमुख दिसून येणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.









