सांखळी/प्रतिनिधी
कारापूर सांखळी येथील रहिवासी आणि वेळगे श्रीमती विद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका फातिमा कायरो या आपल्या विध्यार्थी वर्गाला सोबत घेऊन गेल्या तीस वर्षा पासून वेळगे सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त फुलांची रांगोळी घालत आहेत. यंदा ही त्यांनी वेळगे गणेश मंडळ सभागृहात भली मोठी फुलांची रांगोळी घातली होती.
गेल्या काही वर्षात फोंडय़ातील जे. के. फाउंडेशन यासाठी सहकार्य करत आहे. यावेळी जे. के. फाउंडेशनचे जे. के. गावकर हे उपस्थित होते. वेळगे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर्फे खास अभिनंदन
सांखळी मतदारसंघातिल वेळगे सार्वजनिक गणेशोत्सवात सलग तीस वर्षे आपल्या विध्याथ्या?ना सोबत घेऊन फुलांची रांगोळी घालणाऱया फातिमा कायरो यांचे आणि यंदा तिसाव्या वषी रांगोळी घालण्यासाठी उपस्थित होते त्या सर्वांचे वेळगे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले. आणि फातिमा कायरो यांचे यंदाही भलीमोठी सुरेख रांगोळी घातल्याबद्दल अभिनंदन करतो असे मंडळ अध्यक्ष सगुण घाडी यांनी याविषयी सांगितले.









