क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सेंट पॉल्स पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित फादर जेकब कार्व्हालो चषक आंतरशालेय मुला-मुलींची 7 ए साईड फुटबॉल स्पर्धा बुधवार दि. 23 रोजी सेंट पॉल्स मैदानावर आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेच्या चषकांचे अनावरण करण्यात आले.
सेंट पॉल्स पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित 17 वर्षाखालील मुला-मुलींच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या चषकांचे अनावरण फादर स्टिव्हन अलमेडा, विजय रेडेकर, जॉर्ज रॉड्रिग्स यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत मुलांच्या गटात सेंट पॉल्स अ, ज्योती सेंट्रल महिला विद्यालय अ, केएलई सीबीएससी निपाणी, मराठा मंडळ अ, सर्वोदय खानापूर, केएलएस ब तर ब गटात सेंटपॉल्स अ, सेंट मेरिज, केएलएस अ, संत मीरा, महिला विद्यालय ब, जीवनज्योती मराठा मंडळ ब संघांचा समावेश आहे. तर मुलींच्या गटात सेंट झेवियर्स अ, डीपी संत मीरा, सेंट झेवियर्स ब, महिला विद्यालय, सेंट जोसेफ ब, सेंट जोसेफ अ या संघांचा समावेश आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सेंट पॉल्स पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पद्मिनी रविंद्र, फादर स्टिव्हन अलमेडा उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाचा सामना सेंट पॉल्स ब व जीवनज्योती यांच्यात होणार आहे.









