वृत्तसंस्था/ भरूच
गुजरातच्या भरूच जिल्ह्यात व्हॅन-ट्रक यांच्यात टक्कर झाली असून या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. एका खासगी व्हॅनने ट्रकला मागून धडक दिल्याने तीन मुलांसमवेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेत 4 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही दुर्घटना सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मगनद गावानजीक जंबूसर-आमोद मार्गावर घडली आहे. वेदाच गावातील 10 लोक शुक्लातीर्थच्या दिशेने व्हॅनमधून जात होते. व्हॅनने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रकला धडक दिली होती. या दुर्घटनेत 6 प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेतील जखमींना जंबूसर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दुर्घटनेनंतर पोलिसांनी ट्रकच्या अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. फरार चालकाचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.









