Farali Pattice: नवरात्रीचे उपवास सुरु आहेत. अशा वेळी रोज शाबू,वरी किंवा शाबुवडा हे पदार्थ खाऊन कंटाळा येतो.म्ह्णूनच आज आम्ही उपवासाची एक वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत.जी झटपट बनते शिवाय टेस्टी देखील. चला तर मग जाणून घेऊयात हे पॅटिस कसे बनवायचे.
साहित्य
चार उकडलेले बटाटे
दीड कप खवणलेलं ओलं खोबरे
अरारुट किंवा साबुदाण्याची पावडर
तेल
२ ते ३ हिरव्या मिरच्या
मीठ
तूप
कृती
प्रथम बटाटे उकडून घ्या. बटाटे थंड झाल्यावर ते किसून घ्या. नंतर त्यामध्ये ३-४ चमचे अरारुटची पावडर घाला.त्यामध्ये मीठ घालून ते पीठ छान मळून घ्या. आणि १० मिनिटे फ्रिज मध्ये ठेवा.तोपर्यंत पॅटिससाठी लागणारे सारण बनवून घ्या. खवणून घेतलेल्या खोबऱ्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालून सारण तयार करून घ्यावं.१० मिनिटांनी फ्रिज मधील पीठ बाहेर काढावे. हाताला थोडसं तूप लावून त्या पिठाची वाटी करून घ्या आणि त्यामध्ये खोबऱ्याचे सारण भरून त्याचा गोळा तयार करा.तयार झालेले गोळे अरारुटच्या पिठामध्ये घोळून घेऊन मंद आचेवर टाळून घ्यावेत. आणि गरमागरम पॅटिस खोबऱ्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करावेत.
उपवासाची चटणी
एक वाटी खोबऱ्याचे तुकडे, ४ हिरव्या मिरच्या , २ चमचे शेंगदाणे (दाण्याचा कूटही चालेल), एक चमचा जिरे, आणि चवीनुसार मीठ हे सर्व पदार्थ मिक्सरवर वाटून घ्या. गरजेनुसार पाणी घालून त्याची जाडसर चटणी करून घ्या. ही चटणी पॅटिस, उपवासाचे घावन किंवा शाबूवड्यासोबत तुम्ही सर्व्ह करू शकता.
Previous Article…अन् कोल्हापुरात पोलीसांनी घातली पाकिस्तानच्या ध्वजावरून गाडी
Next Article लेसर शोच्या झगमगाटात मिरवणूकीने दुर्गामूर्तीचे आगमन









