सावंतवाडी । प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी हरिचरणगिरी तळेकरवाडी येथील बीएसएनएल कंपनीचा उभारण्यात आलेला टॉवर कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी हरिचरणगिरी येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी सावंतवाडी बीएसएनएल कार्यालयासमोर सरपंच दत्ताराम दुतोंडकर यांच्या नेतृत्वाखाली उपोषण छेडले .8 महिन्यापूर्वी या टॉवरचे काम पूर्ण झाले असून अद्यापही हा टॉवर कार्यान्वित झालेला नाही. सातत्याने बीएसएनएल विभागाला पाठपुरावा करून देखील त्याचीच दखल घेतली गेली नसल्याने अखेर ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. सरपंच दत्ताराम दुतोंडकर यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू केले. शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब, सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, विभागप्रमुख विनोद ठाकूर यांनी उपोषणाला पाठिंबा दिला यावेळी राऊळ यांनी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेत एक महिन्यात बीएसएनएल टॉवर कार्यरत करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. यावेळी उपसरपंच रवींद्र धोंड , प्रशांत प्रभुखानोलकर ,आनंद दाभोलकर ,भिकाजी गावडे, अनंत मठकर ,अनंत केळजी ,प्रताप करंगुटकर ,सुनील प्रभुखानोलकर ,विलास मांजरेकर ,प्रकाश नागोळकर ,सचिन वाडेकर , सत्यवान दुतोंडकर, शशिकांत असोलकर,श्रीकृष्ण हळदनकर, रवींद्र शिरोडकर, साहिल सावंत, निलेश म्हापणकर,जयेश आकेरकर,समीर केळूसकर उपस्थित होते .









